One Month Free Computer Training / एक महिना मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग
Empowering bright students with digital education for a competitive era.
Program Overview
Inauguration of 'One Month Free Computer Training' for bright students of 7th, 8th, and 9th standard in a joint venture by Madni Charitable Trust, Sangli and IGC Forum, Pune. The computer center was inaugurated by chief guest Dr. Sandip Kundale Sir.
The program aims to provide modern technology knowledge, accelerate digital education, and enable students to move forward confidently. We ensure no student is deprived of digital learning due to financial conditions, as computer education is the need of the hour.
मराठी माहिती
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘एक महिना मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग’ उपक्रमाचा शुभारंभ💐 मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली व आय.जी.सी. फोरम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वी, ८ वी व ९ वीच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘एक महिना मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग’ उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
या कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. संदीप कुंडले सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, डिजिटल शिक्षणाची गती वाढावी आणि बदलत्या स्पर्धात्मक युगात त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “आजच्या डिजिटल युगात संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम पिढी घडविणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात भर घालावी, असे आवाहन मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली व आय.जी.सी. फोरम, पुणे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आय.जी.सी. फोरमचे प्रा. डॉ. के. जी. पठाण सर, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान युसुफ पठाण, तसेच इम्रान बेग, हाजी निसार पठाण, युसुफ पठाण, फजल पठाण, अझरुद्दीन सैय्यद, मौलाना इस्माईल, हफीज इलियास, इमरान सय्यद, सचिन कोळी, आयशा शेख आणि समीर मुजावर यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Age Group
7th, 8th, and 9th standard students
Duration
One Month
Certificate
Certificate of Completion

Program Objectives
Digital Enablement
Accelerate digital education for bright students without financial boundaries.
Modern Skills
Combine textual knowledge with modern technology for future readiness.
Key Benefits
Learning Outcomes
- 1
Familiarity with digital tools and resources
- 2
Basic technical computing proficiency
- 3
Stronger foundation for high-school assignments and projects
Program Gallery






Interested in One Month Free Computer Training / एक महिना मोफत कॉम्प्युटर ट्रेनिंग?
Get in touch with us to know more about enrollment, batch schedules, and fees for this program.